CM Uddhav Thackeray : आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसलं - मुख्यमंत्री ठाकरे - Maharashtra Political Crisis
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय घडामोडीत शुक्रवारी सांयकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाइव्ह येत सर्व शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आघाडी स्थापन करताना अनेकांनी मला सांगितले होते की, काँग्रेस व राष्ट्रवादी आपल्याला दगा देतील. पण, महादेवाप्रमाणे एकदा विष प्राशन करुन पाहू, असे म्हणत आघाडी स्थापन केली. पण, आज तेच राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आम्ही शिवसेना व मुख्यमंत्री यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असे सांगितले. मात्र, आपल्याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसल. नगरसेवकापासून ते खासदारांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न केले. शिवसैनिकांच्या प्रयत्नातून लोकांनी त्यांना मतदान केले अन् ते निवडून आले. त्यांनी आज काय केले. ते म्हणतात भाजपसोबत सत्ता स्थापन करू. पण, द्वेषापोटी भाजपकडून केंद्रीय यंत्रणेचा वापर करत चौकशा केल्या जात आहेत ज्यांना अटक केली जात आहे. त्यांच्याकडून मैत्रीची अपेक्षा कशी करायची, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, यातील जे केंद्रीय चौकशीनंतर अडकणार होते ते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना क्लिनचिट मिळणार आहे का. त्यासाठीच ते भाजपसोबत जाण्याचे प्रयत्न करत आहेत, असा आरोपही केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST