Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं घेतली श्रीमंत शाहू महाराजांची भेट - Shrimant Shahu Maharaj
🎬 Watch Now: Feature Video


Published : Nov 11, 2023, 10:43 PM IST
कोल्हापूर : अवघ्या काही सेकंदात महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद पटकावणारा पैलवान सिकंदर शेखनं आज श्रीमंत शाहू महाराजांचं कोल्हापूरात दर्शन घेतलं. तब्बल 37 वर्षांनंतर महाराष्ट्र केसरी म्हणून गंगावेस तालमीतला पैलवान सिकंदरच्या रुपानं मिळाल्याबद्दल शाहू महाराजांनी समाधान व्यक्त केलं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गतविजेत्या शिवराज राक्षेचा पराभव करत पैलवान सिकंदर शेख यानं आज श्रीमंत शाहू महाराज, माजी आमदार मालोजीराजे यांची भेट घेतली. यावेळी महाराजांनी सिकंदर शेखला एक लाखाचं रोख बक्षीस दिलं. पैलवान सिकंदर शेखचे वडील रशीद शेख यांनी मुलगा महाराष्ट्र केसरी व्हावा, यासाठी पंढरपूरच्या विठुरायाला साकडं घातलं होतं. सिकंदरला मानाची महाराष्ट्र केसरी गदा मिळावी, यासाठी रशीद शेख दिवसातून पाच वेळा नमाज अदा करायचे. त्यांनी घातलेलं साकडं तसंच कोल्हापूरच्या कुस्ती शौकिनांच्या प्रेमामुळं महाराष्ट्र केसरी गदा मिळवू शकलो, अशी प्रतिक्रिया सिकंदर शेखनं व्यक्त केली आहे.