Nana Patole केजरीवाल यांचा बोलवता धनी कोणी दुसराच - नाना पटोले - केजरीवाल यांचा बोलवता धनी
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल arvind kejriwal यांचा बोलविता धनी कोण आहे, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole यांनी उपस्थित केला आहे. भारतीय चलनावर कुणाचे फोटो असावेत याला आमचा विरोध नाही मात्र आधी रुपयांचे झालेले अवमूल्यन थांबायला हवं अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केलीय. ते आज नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. nana patole in nanded राज्यात येणारे तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेलेत, त्यामुळे महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्यासाठी शिंदे फडवणीस सरकार काम करतय अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. याविषयी आम्ही सोमवारी राज्यपालांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST