शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक; विधानसभेच्या पायऱ्यांवर गळ्यात संत्र्यांच्या माळा घालून आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 7, 2023, 12:31 PM IST
नागपूर Assembly Winter Session 2023 : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी आज सकाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, अनिल देशमुख, वर्षा गायकवाड, आदी नेत्यांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे, अशा घोषणा विरोधी पक्षाच्या आमदारांनी दिल्या आहेत. बळीराजा अवकाळी पावसानं त्रस्त असताना राज्य सरकार हे मात्र, जाहिरातीत व्यस्त असल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यात अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांची दैना झाली असताना खोके सरकार मस्त असल्याच्या घोषणा विरोधकांनी दिल्या आहेत. दुष्काळ सदृश्य स्थिती आहे, हे सरकार सांगत आहे. मात्र, हेच सरकार अदृश्य असल्याचं बॅनर आमदारांनी हातात घेतले.