Lunar Eclipse : चंद्रग्रहण समज आणि गैरसमजावर लीना बोकील यांची उपयुक्त माहिती, भारतात ५ मे रोजी दिसणार चंद्रग्रहण - भारतात ५ मे रोजी दिसणार चंद्रग्रहण

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 26, 2023, 7:45 PM IST

पुणे : भारतात 5 मे रोजी चंद्रग्रहण दिसणार आहे, पण त्या चंद्रग्रहणाबद्दल अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. पंडितांकडून वेगवेगळ्या स्वतंत्र गोष्टी बोलल्या जात आहेत. म्हणूनच खगोलशास्त्रज्ञांनी या बद्दल माहिती दिली आहे. अंधश्रद्धेपासून नागरिकांनी दूर, रहावे असे खगोलशास्त्र लीना बोकील यांनी केले आहे. यावेळी बोलतांना बोकील म्हणाल्या की, आपल्या समाजात काही अंधश्रद्धा गैरसमज रूढ झाले आहेत. चंद्रग्रहण तुम्ही संध्याकाळी रात्री बसून पहावे. हे चंद्र ग्रहण भारतातही दिसणार आहे. एशिया युरोप, आफ्रिका या खंडामध्ये सुद्धा रात्री साडेदहा वाजता 5 मे राजी हे चंद्रग्रहण दिसेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. सूर्य, चंद्राच्यामध्ये पृथ्वी एक लाईनमध्ये येते. तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यालाच चंद्रग्रहण म्हणतात. प्राचीन काळापासून ग्रहणाच्या वेळी अंधश्रद्धा पसरवल्या जात आहे. हिंदू धर्मात गरोदर महिलांनी चंद्रग्रहण बघू नये, ग्रहणामध्ये आंघोळ करू नये, जेवण करू नये, झोपू नये, असे म्हटले आहे. या ग्रहणाबाबत सर्व अंधश्रद्धा असुन प्रत्येकांने ग्रहणाचे निरिक्षण करायले हवे असे, नीना बोकील यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.