अखेर बिबट्या जेरबंद; वनविभाग आणि पोलिसांच्या प्रयत्नांना यश - वनविभाग आणि पोलिस

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 2:14 PM IST

पिंपरी चिंचवड : Leopard in Pune पिंपरी चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरात अचानक बिबट्या आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास देहू-आळंदी रोडवरील चिखली जवळ मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना बिबट्या दिसला. तसंच रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील दृश्ये कैद झाली आहेत. यामुळे चिखली कुदळवाडी परिसरात भीतीचं वातावरण आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पोलीस आणि वनविभागानं शर्तीचे प्रयत्न केले. काही तासातच बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. हा बिबट्या लोकवस्तीमध्ये शिरल्यामुळं त्याला पकडण्यात मोठी अडचण होती. सुरुवातीला हा बिबट्या सोनवणे वस्ती परिसरातील एका गोडाऊनमध्ये लपला होता. त्यानंतर तेथून तो पळून सुदर्शननगर समोरील ज्वारीच्या शेतात घुसला होता. शेजारीच असलेल्या अशोक मोरे यांच्या गोठ्यात देखील हा बिबट्या घुसला होता. या गोठ्यात जनावरे असल्यामुळे भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. अखेर वनविभाग आणि पोलिसांच्या टीमला या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश मिळालं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.