Landslide in Mumbai : अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटी परिसरामध्ये कोसळली दरड, फ्लॅट्समध्ये साचला मातीचा ढिगारा - सोसायटीमध्ये दरड कोसळल्याची घटना

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 25, 2023, 8:37 AM IST

Updated : Jul 25, 2023, 11:57 AM IST

मुंबई : पावसाळा सुरू झाला की, भुसख्खलनाच्या घटनांमध्ये वाढ होते. मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटी परिसरामध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मध्यरात्री 2 च्या सुमारास रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेल्या डोंगरामधून सोसायटीच्या पहिला मजल्यावर चार ते पाच फ्लॅट्सवर दरड कोसळली. मध्यरात्री आपापल्या घरांमध्ये सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. सुदैवाने या दरड दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पाच ते सहा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या या डोंगरामधून इमारतीवर सतत माती कोसळत आहे. इमारतीच्या 165 घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरड दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या दोन गाड्या आणि मुंबई पोलिसांचे जवान घटनास्थळी दाखल झाले. 

Last Updated : Jul 25, 2023, 11:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.