Lalu Yadav on Rahul Gandhi : चकाचक दाढी करून बोहल्यावर चढा; लालूंचा राहुल गांधींना भन्नाट सल्ला - Lalu Yadav on Rahul Gandhi marriage

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 23, 2023, 6:30 PM IST

Updated : Jun 23, 2023, 7:29 PM IST

बिहार(पाटणा) - विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लालू यादव यांनी आपल्या जुन्या आणि विनोदी शैलीत नरेंद्र मोदी सरकारशिवाय विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या लग्नाचाही विषय काढला. फक्त दाढी नका वाढू, आता लवकर लग्न करण्याचा सल्ला लालू यादव यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.  

राहुल गांधींच्या लग्नावरून डिवचले - लालू यादव यांनी राहुल गांधींना गंमतीत लग्नावरून डिवचले आहे. 'दाढी वाढवू नका फक्त, लग्न पण करा' असे लालू यादव या पत्रकार परिषदेवेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, तुमची आई (सोनिया गांधी) म्हणत होत्या की ते (राहुल गांधी) माझे ऐकत नाहीत. तुम्ही लोक राहुल गांधींचे लग्न लावा.  

विरोधी पक्षांची बैठक - बिहारची राजधानी पाटणा येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लालू यादव यांनी आपल्या चिरपरिचित शैलीत टीका केली. ते म्हणाले, उपचारानंतर मी आता पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहे. तसेच आता नरेंद्र मोदींनाही तंदुरुस्त करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. आता पुढील बैठक शिमल्यात होणार असून, तेथूनच पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदी चंदनाचे वाटप करतात - लालू यादव म्हणाले की, जनता म्हणायची की तुम्ही एक नाही. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन भाजपचा विजय होतो. आता आपण एक होत आहोत. नरेंद्र मोदी हिंडून फिरून चंदनाचे वाटप करत आहेत, अमेरिकेत जाऊनही चंदन वाटली आहेत, अशी बोचरी टीका लालू यादव यांनी केली आहे. 

Last Updated : Jun 23, 2023, 7:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.