तीर्थेक्षेत्र आळंदीतील कार्तिकी वारीला आजपासून सुरवात; आळंदी बंदला संमिश्र प्रतिसाद - Tirthekshetra Alandi
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 5, 2023, 3:38 PM IST
पुणे : Kartiki Vari in Tirthekshetra Alandi ज्ञानेश्वर माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा आणि तीर्थेक्षेत्र आळंदीतील कार्तिकी वारीला आजपासून सुरवात होत आहे. आज वारकरी आळंदीमध्ये दाखल होत आहेत. मात्र विश्वस्त पदावरून सुरू असलेल्या वादावरून ग्रामस्थांनी आळंदी बंदची हाक दिली आहे. या बंदला आळंदीमधून संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यातील असंख्य वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. पहाटे माऊलीच्या समाधीला पवमान अभिषेक घातल्या नंतर पंचारती करण्यात आली आहे. गुरुवर्य हैबत बाबांच्या पायरी पूजनाने या सोहळ्याला सुरवात होते. तर 11 डिसेंबर रोजी संजीवन समाधी दिनाचा मुख्य सोहळा लाखो भक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. आळंदी ग्रामस्थांनी पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यानी प्रतिसाद दिला असून फुलं विक्रेते, इतर दुकानदारांनी बंद मध्ये सहभागी होत दुकाने बंद ठेवली आहेत.