PM Modi Road Show In Mysore: पंतप्रधान मोदींचा म्हैसूरमध्ये रोड शो! म्हणाले, राज्यातील राजकीय अस्थिरतेसाठी काँग्रेस जबाबदार -पंतप्रधान मोदी - पंतप्रधान मोदींचा म्हैसूरमध्ये रोड शो
🎬 Watch Now: Feature Video

म्हैसूर (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवार म्हैसूरमध्ये मेगा रोड शो केला. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने लोक आणि भाजप समर्थकांनी गर्दी केली होती. पंतप्रधान मोदी खास डिझाईन केलेल्या वाहनातून लोकांना नमस्कार करत आहे. लोकांनी वाटेत फुलांचा वर्षाव केला. दरम्यान, भाजप समर्थकांनी मोठ्या प्रमाणात पक्षाचे चिन्ह, भाजपचे झेंडे हातात घेऊन गर्दी केली. रोड शो दरम्यान पंतप्रधानांसोबत भाजपचे माजी नेते केएस ईश्वरप्पा देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे, पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. येथे त्यांनी काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षांच्या विरोधात जोरदार भूमिका घेतली होती.