हिंदू हा शब्द पर्शियातून आला तो भारतीय नाही; कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य
🎬 Watch Now: Feature Video
कर्नाटक - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाबाबत विधान करून नवा वाद निर्माण केला आहे. हिंदू हा शब्द केवळ भारताचा नाही, असे ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, की हिंदू हा शब्द पर्शियातून आला आहे. तसेच, हिंदू शब्दाचा अर्थही अत्यंत गलिच्छ असल्याचे ते म्हणाले आहेत. हिंदू शब्दाचा अर्थ कळला तर लाज वाटेल. काल रविवारी (दि. 7 नोव्हेंबर)रोजी आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यातील निप्पाणी भागात आले होते त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST