Janmashtami २०२३ : मथुरेत कृष्ण जन्मोत्सव धूमधडाक्यात साजरा, Watch Video - जन्माष्टमी 2023
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 8, 2023, 7:48 AM IST
मथुरा : मथुरेत गुरुवारी रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सवाचा जल्लोष सुरू झाला. श्रीकृष्णजन्मभूमी मंदिर परिसरात कृष्ण जन्मोत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं जमलेल्या भाविकांनी, 'हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की, अशा घोषणा दिल्या. श्री कृष्णजन्मभूमी मंदिर संकुलातील भागवत भवनात रात्री १२ वाजताची वेळ होताच मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यावेळी संपूर्ण मंदिराच्या प्रांगणात शंख, घुंगर, झांज, मंजिरा यांचा आवाज घुमत होता. दरम्यान, फुलांचीही उधळण करण्यात आली. यावेळी श्रीकृष्णाला १००८ कमळ अर्पण करण्यात आले. त्यानंतर ठाकूरजींचा चांदीच्या कमळाच्या फुलात विधीवत उत्सव आणि अभिषेक करण्यात आला. ठाकूरजींचा गायीच्या दुधाने अभिषेक करण्यात आला. रात्री १२.१५ वाजता महाआरती झाली. पहा हा व्हिडिओ..