बनारस हिंदू विद्यापीठात 'जाणता राजा'; 300 कलावंत सादर करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित नाटक - काशी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची साक्षीदार
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 24, 2023, 2:23 PM IST
लखनऊ Janata Raja In BHU : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेलं जाणता राजा हे नाटकाचं आयोजन बनारस हिंदू विद्यापीठात करण्यात आलं आहे. 17 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरदरम्यान 'जाणता राजा' नाटकाचे प्रयोग बनारस हिंदू विद्यापीठात सादर करण्यात येणार आहेत. नाटकात तब्बल 300 कलाकारांचा सहभाग असून 350 वर्षांनंतर काशी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची साक्षीदार बनली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘जाणता राजा’ हे नाटक बनारस हिंदू विद्यापीठाच्या एमपी थिएटरमध्ये सादर करण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी 'जाणता राजा' हे नाटक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आणि राज्याभिषेकावर आधारित होतं. यावेळी 'जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव' घोषणांनी मैदान दणाणून गेलं. 'जाणता राजा' या महानाट्याच्या तिसऱ्या दिवशी ईटीव्ही भारतनं नाटकातील प्रमुख पात्र असलेल्या कलावंतांसोबत खास बातचीत केली.
"छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या नसानसात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना काशी क्षेत्र प्रिय होतं. अशा परिस्थितीत त्यांच्या नाटकात काम करुन काशीत आम्हाला आनंद होत आहे" असं या कलावंतांनी सांगितलं. या कलावंतांमध्ये डॉ वैभव जोशी यांनी अफझल खानाची (कानू जी) भूमिका साकारली आहे. तर तेजस्वी नांगरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांची भूमिका साकारली. महेश आंबेकर यांनी साहीर (सूत्रधार) ही व्यक्तिरेखा साकारली. अभिजीत पाटणेनं छत्रपती शिवाजी महाराजांची महत्त्वाची भूमिका साकारली. योगेश भंडारे यांनी छत्रपती शिवरायांची युवा भूमिका साकारली आहे. नाटकाचं दिग्दर्शन योगेश सिरोळे यांनी केलं आहे. या नाटकात 300 कलाकारांपैकी 80 कलाकार पुण्यातील आहेत, तर 200 कलाकार स्थानिक आहेत.