Chitra Wagh Advise: 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहण्याऐवजी रितसर लग्न करा - चित्रा वाघ यांचा सल्ला - भाजप नेत्या चित्रा वाघ
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18722014-thumbnail-16x9-wagh.jpg)
ठाणे (भाईंदर): भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सरस्वती वैद्य हत्या प्रकरणात पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व प्रकरणाची माहिती घेत संबंधित नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी तसेच या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली आहे. 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहणाऱ्या महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे महिलांनी देखील या भानगडीत न पडता आई-वडिलांच्या संमतीने लग्न करावे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. श्रद्धा वालकर प्रकरण अद्यापही विसरलो नाही. सरस्वती वैद्य यांची घटना अतिशय गृहस्पद असून वारंवार अशा घटना घडत असल्याने महिलांची पिळवणूक होत आहे. 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहणाऱ्या महिलांचे कौटुंबिक संबंध बिघडत आहेत. त्यामुळे आपली मुलगी कुठे आहे याचा पत्ता देखील पालकांना लागत नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या. सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमकही सुरू आहे. त्यातच शनिवारी सरस्वती वैद्य हत्याकांडामध्ये भाईंदरमध्ये पोलिसांची भेट घेण्यासाठी चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांना डिवचले आहे. महिलांचे चारित्र्य बदनाम करून वावरणाऱ्या जितेंद्र आव्हाडांसारख्या गिधाडाचे गर्वहरण मीच करणार असेही त्या म्हणाल्या आहेत.