Indian Army Playing Cricket : गलवानमध्ये रंगला भारतीय सैन्याचा क्रिकेट सामना! पाहा व्हिडिओ - भारतीय लष्कर गलवानमध्ये क्रिकेट खेळताना
🎬 Watch Now: Feature Video
वास्तविक नियंत्रण रेषेवर LAC भारत आणि चीन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून तणाव सुरु आहे. काल नवी दिल्लीत भारत आणि चीनचे परराष्ट्र मंत्री एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. त्यानंतरच भारतीय लष्कराने काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ही छायाचित्रे पाहून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून जाईल, त्याचबरोबर चीनलाही भारताच्या ताकदीचा अंदाज येईल. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण असताना भारतीय लष्कराच्या जवानांनी क्रिकेट खेळतानाचे फोटो जारी केले आहेत. छायाचित्रांमध्ये भारतीय लष्कराचे सैनिक पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीजवळ क्रिकेट खेळताना दिसत आहेत. मात्र, भारतीय सैनिक कोणत्या ठिकाणी क्रिकेट खेळत आहेत याचा खुलासा भारतीय लष्कराने केलेला नाही. छायाचित्रांमध्ये बर्फाच्छादित पर्वत दिसत आहेत. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या लष्करामध्ये कथित हिंसक संघर्ष झाला होता, ज्यामध्ये भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले होते.