IND vs NZ Semifinal : धमकीनंतर वानखेडे स्टेडियम समोर पोलीस सुरक्षा यंत्रणा वाढवली; प्रेक्षकांना तपासणी करून मैदानात प्रवेश, पाहा व्हिडिओ - security increased in front of Wankhede Stadium

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 1:01 PM IST

मुंबई IND vs NZ Semifinal : आज विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होत आहे. 2019 मध्ये न्युझीलंडनं विश्वचषक स्पर्धेत भारताला हरवलं होतं. त्याचा बदला घ्यावा अशी प्रत्येक भारतीयांना इच्छा आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, सुरक्षिततेबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. आज मुंबई पोलिसांना सोशल मीडियावरून वानखेडे स्टेडियममध्ये आग लावण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळं पोलीस सतर्क झाले आहेत.  सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आलीय. यामुळं अधिक खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस सतर्क झाले आहे.  मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा आणि फौजफाटा तैनात करण्यात आलाय.  दक्षिण मुंबईत अधिक गर्दी असल्यामुळं संपूर्ण दक्षिण मुंबईत सुद्धा सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलीय. मैदानात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना आत सोडण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी सत्य नारायण यांनी दिलीय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.