Shravan : श्रावण महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास मिळतात शुभार्शिवाद - भगवान शंकर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 29, 2022, 9:53 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

हिंदू धर्मामध्ये श्रावण (Shravan) महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. या महिन्यात येणाऱ्या विविध सणांमुळे आपापसातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते. श्रावण महिन्यात भगवान शंकराची (Lord Shankar) भक्ती केल्यास, फलप्राप्ती होते. याच महिन्यात माता पार्वतीने कठोर व्रत करून, भगवान शंकरांना प्रसन्न केले होते. या महिन्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्व आहे. प्रत्येक दिवसाची पूजा,अनुष्ठान, विधी पुराणात सांगितली आहे. शिवामुठच्या व्रताला दर सोमवारी तांदुळ, तीळ, मुग, जवस आणि सातु अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मुठीने धान्य वाहतात. श्रावण महिन्यातील नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखे असते. तसेच, यामहिन्यामध्ये मंगळागौर, पोळा, नागपंचमी, रक्षाबंधन असे अनेक सण येतात. अनेक भाविक श्रावणातील दर शनिवारी आणि सोमवारी भगवान भोलेनाथाची मनोभावे पूजा करतात. तसेच उपवास, व्रत, वैकल्या करतात. श्रावण महिन्यात (If you worship Lord Shankara in the month of Shravan) भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास शुभार्शिवाद (you will get blessings) प्राप्त होतात. असा हा श्रावण महिना सर्वत्र आनंद, उत्साह पसरवतो, असे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.