सर्व गडकिल्ल्यांच्या दुरूस्तीसह ॲट्रॉसिटीचा कायदा सर्व जातींसाठी करा; तरुणांचं आमरण उपोषण

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

शिर्डी (अहमदनगर) Hunger Strike in Rahuri : महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ल्यांची दुरुस्ती करावी, तसेच ॲट्रॉसिटीचा कायदा (Atrocities Act) सर्व जातींसाठी समान करण्यात यावा, यामागणीसाठी राहुरीतील २ तरुणांनी १ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केलंय. महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास सांगणाऱ्या गडकिल्ल्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. वैभवशाली इतिहासाचे अनेक साक्षीदार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ल्यांची दुरुस्ती करावी, तसंच ॲट्रॉसिटी या कायद्याचं संरक्षण सर्व जातींसाठी देण्यात यावं, या मागणीसाठी राहुरी शहरातील  रवींद्र तनपुरे आणि राहुरी फॅक्टरी येथील केशव हारदे या दोन तरुणांनी आमरण उपोषणला सुरुवात केली आहे. टाकळीमिया रोडवरील वाघाचा आखाडा येथील मियासाहेब बाबा पाऊदका येथे त्यांचं उपोषण सुरू आहे. प्रशासन याकडं लक्ष देणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Last Updated : Jan 7, 2024, 5:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.