Heavy Snowfall In Gangotri: गंगोत्री धाम उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी - dehradun latest news
🎬 Watch Now: Feature Video
चमोली (उत्तराखंड) : गंगोत्री धाममध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे नजारा मनमोहक झाला आहे. गंगोत्री धाममध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर डोंगर चांदीसारखे चमकत आहेत. काल संध्याकाळी झालेल्या बर्फवृष्टीमुळे गंगोत्री धामच्या डोंगररांगा बर्फाने झाकल्या गेल्या आहेत. दुसरीकडे बर्फवृष्टीमुळे प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गंगोत्री धाममध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीनंतर थंडी वाढली आहे. गंगोत्री धाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. हिमवृष्टीमुळे धामालगतच्या डोंगरांनी पांढरी चादर पांघरली आहे. त्यामुळे तापमानात घट झाल्याने, धाममध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. त्याचबरोबर धाममध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीनंतर प्रवाशांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे मे महिन्यात डिसेंबर महिना जाणवत आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बर्फाळ वातावरण निर्माण झाले आहे.