Pune Heavy Rain पुण्यात तुफान पाऊस, स्टेशन परिसराला नदीचे रुप - pune city railway station area was flooded

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 18, 2022, 3:39 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

पुणे परतीच्या पावसाला सुरवात झाल्यापासून पुणे सह राज्यात विविध भागात जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. Pune Heavy Rain गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रोजच शहरात पाऊस होत असून दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्रीच्या वेळेस पुण्यात विजेच्या कडकडटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. pune city railway station area was flooded शहरातील मध्यवर्ती भाग नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. काल रात्री ९ नंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडवली. विजांच्या कडकडाटात पडणाऱ्या संततधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अवघ्या १२ तासांपेक्षा कमी कालावधीत शहरात तब्बल १०४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर झालेल्या या पावसाने पुणे शहरातील स्टेशनमध्ये पाणी शिरलं आहे. स्टेशन परिसरात असलेल्या अंडरग्राऊंड पुलात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला पाहायला मिळत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.