नांदेडमध्ये गुरू गोविंद सिंग यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी; गुरुद्वारात भाविकांची मोठी गर्दी - गुरु गोविंद सिंग यांची जयंती
🎬 Watch Now: Feature Video


Published : Jan 17, 2024, 3:50 PM IST
नांदेड Guru Gobind Singh Jayanti 2024 : शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू श्री गुरुगोविंद सिंग यांची आज 358 वी जयंती आहे. नांदेड ही श्री गुरू गोविंद सिंग यांची कर्मभूमी आहे. शीख धर्मियांचे दहावे धर्मगुरु श्री गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती निमित्त शहरातील सचखंड गुरुद्वारा परिसर फुललाय. शिख धर्मियांसाठी नांदेड हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते. गुरू महाराजांच्या जयंती निमित्त नांदेडच्या गुरूद्वारात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच दर्शनासाठी गुरुद्वारात शिख भाविकांची मोठी गर्दी पाहायाला मिळत आहे. देश विदेशातून भाविक सचखंड श्री हुजूर साहेब नांदेड गुरुद्वारात दर्शनासाठी आले आहेत. तसंच शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.