Bharat Jodo Yatra मला राहुल गांधी यांना डोळे भरून पाहायचंय, या आजीबाईंची इच्छा - राहुल गांधींना डोळे भरून पाहायची आजीबाईंची इच्छा
🎬 Watch Now: Feature Video

हिंगोली आज पहाटे हिंगोली शहरांमध्ये भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra in Hingoli दाखल झाली आहे. शहर परिसरातील नागरिक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अशाच परिस्थितीमध्ये अनेक वयोवृद्ध आपल्या मागण्या घेऊन राहुल गांधी यांच्याकडे आलेले आहेत. एक वयोवृद्ध आजी पहाटे चार वाजेपासून हिंगोली शहरामध्ये राहुल गांधी यांना भेटण्यासाठी आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर येथील गिरीजाबाई दाजीबा जगताप आजीबाई पहाटे चार वाजेपासून हिंगोली शहरामध्ये दाखल झाल्या आहेत. मी अजूनही राहुल गांधी यांना डोळे भरून पाहिलेले नाही, यापूर्वी एकदा दुरून त्यांना पाहण्याचा योग आला होता, मात्र भेट झाली नव्हती, आता तर माझ्या जिल्ह्यात राहुल गांधी आले आहेत. त्यामुळे मी त्यांना डोळे भरून पाहणार आहे. याच आशेने मी या ठिकाणी पहाटे चार वाजता माझे सर्व कामे सोडून आल्याचे आजीबाई सांगतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST