Police Viral Video: हेल्मेट कुठे आहे?, मुलींनी पाठलाग करून विचारताच, पोलिसांनी गाडी पळवली, व्हिडीओ व्हायरल - पोलिसांनी घातले नव्हते हेल्मेट

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 18, 2023, 2:00 PM IST

नवी दिल्ली/गाझियाबाद: आतापर्यंत तुम्ही गुन्हेगारांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांबद्दल ऐकले असेलच, पण गाझियाबादमध्ये एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये स्कूटीवर बसलेल्या मुलींनीच पोलिसांच्या बाईकचा पाठलाग केला. यादरम्यान पोलीस कर्मचारी त्यांच्या दुचाकीवरून जात असताना मुलींनी त्यांना तुमचे हेल्मेट कुठे आहे, असा प्रश्न विचारला. हे प्रकरण कवीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदपुरमजवळचे आहे. येथे दोन पोलीस दुचाकीवरून जात असताना दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घातले नव्हते, यावर मुलींनी त्यांच्या मागे जाऊन हेल्मेट कुठे आहे, अशी विचारणा केली. सर्वसामान्यांसाठी नियम आहेत, पोलिसांसाठी काही नियम नाहीत, असा सवालही मुलींनी केला. मुलींनी पोलिसांसाठी काही आक्षेपार्ह शब्दही वापरले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पोलिसांनीही वाहतुकीचे नियम पाळावेत, असे लोकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काही लोकांकडून असेही बोलले जात आहे की, मुलींनी असे व्हिडिओ बनवल्यामुळे त्यांच्या जीवालाही धोका होता. त्याचवेळी, व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी दुचाकी पळवताना दिसत आहेत, ज्यावरून पोलिसांनाही त्यांची चूक लक्षात आल्याचे म्हणता येईल.

हेही वाचा: भारतीय दूतावासावरील तिरंगा उतरणाऱ्यांना बसणार झटका

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.