Girish Mahajan : बाईक रॅलीत हेल्मेट का घातले नाही? गिरीश महाजनांचा अजब तर्क, म्हणाले... - स्वातंत्र्यदिन 2023
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : देशभरात आज ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांपासून ते पालकमंत्र्यांपर्यत सर्वांनी हजेरी लावली. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बाईक रॅलीमध्ये मंत्री गिरीश महाजन विना हेल्मेट बाईक चालवताना दिसले. याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता, येथे हेल्मेटची सक्ती नाही. कोणीच मला हेल्मेट घातलेले दिसले नाही. म्हणून मी हेल्मेट घातले नाही, असे गिरीश महाजन म्हणाले. हेल्मेटबाबत एकीकडे शासन स्तरावर जनजागृती केली जाते. मात्र दुसरीकडे राज्याचे मंत्रीच विना हेल्मेट बाईक चालवत असतील तर यातून जनतेला कुठला संदेश जाईल, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. पाहा हा व्हिडिओ...