Gauri Ganpati २०२३ : गौराईच्या देखण्या मुखवट्यांनी सजली बाजारपेठ; यंदा दागिन्यांमध्ये 'बाईपण भारी'ची क्रेझ - Gauri festival २०२३
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-09-2023/640-480-19533818-thumbnail-16x9-gauri-ganpati-2023.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Sep 17, 2023, 12:14 PM IST
मुंबई : Gauri Ganpati २०२३ : गणेशोत्सव दोन (Ganesh chaturthi 2023) दिवसांवर येऊन ठेपला असल्यानं खरेदीची लगबग वाढली आहे. या खरेदीत गौराईचा थाट वेगळाच असतो. यंदा 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील दागिन्यांची क्रेझ आहे. लालबाग मार्केट परिसरातील दुकानांमध्ये खरेदीस येणाऱ्या महिला थेट याच दागिन्यांची मागणी (Jewellery for Gauri Ganpati) करत आहेत. या चित्रपटात अभिनेत्रींनी घातलेला 'वेलवेट लक्ष्मीहार' यंदा गौराईच्या सजावटीसाठी पसंतीस उतरत आहे.
विविध अलंकार खरेदीसाठी उपलब्ध : लालबाग मार्केटमध्ये (Lalbagh Market) विक्रेत्यांकडे या लक्ष्मीहाराची किंमत ३८० रुपये आहे. याशिवाय फायबर मटेरिअलपासून तयार केलेली संपूर्ण पोशाख दागिन्यांसह तयार गौरीची किंमत १८ हजार रुपयांपासून पुढे आहे. त्यातही बैठ्या स्वरूपातील अथवा उभी असलेली अशा दोन्ही स्वरूपातील गौरी उपलब्ध आहेत. तसेच अन्य दागिन्यांमध्ये कोल्हापुरी साज, बाजूबंद, तोडे, बांगड्या, नथ, ठुशी, चंद्रकोर, साखळ्या, कंबरपट्टा, बिंदी, पैंजण, कृत्रिम फुलांचे गजरे-वेण्या अशी वैविध्यता आहे. या दागिन्यांची किंमत २०० रुपयांपासून ते अगदी ६०० रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याची माहिती चिवडा गल्लीतील विक्रेत्यानं दिली. त्याचप्रमाणं अगदी 20 रुपयांपासून ते थेट एक ते दोन हजार रुपयांपर्यंत गौराईला सजवण्यासाठी नथीपासून ते हार, कंबरपट्टा असे नानाविध अलंकार खरेदीसाठी उपलब्ध आहेत.