Ganeshotsav २०२३ : 'या' बाप्पाचं हृदय धडधडतं, श्वास घेतो आणि मोदकही खातो! पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
आग्रा (उत्तर प्रदेश) : Ganeshotsav २०२३ : काही वर्षांपर्यंत केवळ महाराष्ट्रात साजरा होणार सार्वजनिक गणेशोत्सव (Ganesh Chaturthi २०२३) आता देशातील काना-कोपऱ्यात साजरा होऊ लागला आहे. देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये एका गणेश भक्तानं गणपतीची अनोखी मूर्ती साकारली आहे. या भक्तानं बाप्पाची चक्क जिवंत मूर्ती बनवलीय. हा गणपती माणसाप्रमाणे श्वास घेतो आणि डोळेही मिचकावतो. पंचकुनिया येथील अजय बॉथम यांनी बस आणि ट्रकच्या रबर ट्यूबपासून गणपती बाप्पाची १० फूट उंच मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी लांबून लोकं येतायेत. गणेशभक्त शिल्पकार अजय बॉथम यांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून गणेश मूर्तीची रचना केली आहे. ही मूर्ती भक्तांच्या हातून पाणी पिते आणि प्रसादही खाते. तसेच तुम्ही या मूर्तीला चरणस्पर्श केला तर ती आशीर्वादही देते. अजय बॉथम यांनी ही अनोखी मूर्ती कशी बनवली, जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून..