Ganesh Visarjan 2023 : कोळी महिला देताहेत पारंपरिक नृत्य सादर करत लालबागच्या राजाला निरोप... पाहा - गणेश चतुर्थी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 11:49 AM IST

मुंबई : Ganesh Visarjan 2023 गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. दहा दिवस भक्तांच्या पाहुणचार घेतल्यानंतर आज, अनंत चतुर्दशी ( Anant chaturdashi 2023 ) दिनी बाप्पा आपला निरोप घेणार,  परंपरेनुसार, दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन ( Ganesh immersion ) केलं जातं. मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागच्या राजा'च्या शाही विसर्जन मिरवणूक ( Ganpati 2023 ) सुरु झाली आहे. आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविकांनी लालबागमध्ये रस्त्त्यारस्त्यांवर प्रचंड गर्दी केली आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अनेक ठिकाणांहून आज भाविक मुंबईत दाखल झाले आहेत. लालबाग मच्छी मार्केट मधील कोळी महिलांनी महाराष्ट्रातील पारंपरिक कोळी हा नृत्य प्रकार ( Koli dance ) सादर करत निरोप देताना ई टीव्ही भारत शी संवाद साधला. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.