Kolhapur Shahupuri Youth Mandal: पाहा, कोल्हापूरच्या शाहूपुरी युवक मंडळाची सामाजिक बांधिलकी; गेली 43 वर्षे चालवत आहेत बालवाडी
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर Kolhapur Shahupuri Youth Mandal: यंदाचा गणेशोत्सव सर्वत्र धुमधडाक्यात साजरा होतोय. मात्र, अनेक मंडळांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवले आहेत. कोल्हापुरातील शाहूपुरी युवक मंडळाच्या वतीनं गेली 43 वर्ष बालवाडी चालवली जातेय. बालवयातच नव्या पिढीला संस्कारमय आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम हे मंडळ करत आहे. 1978 यावर्षी स्थापन झालेल्या कोल्हापुरातील व्यापारी पेठेतील शाहूपुरी युवक मंडळानं राजर्षी शाहू बालक मंदिराची स्थापना 1980 साली केलीय. सुरुवातीला हातावर मोजण्याइतकी बालकं या बालवाडीत शिकायची. मात्र, आता ही संख्या 25 वर पोहोचली आहे. बालवाडीतील शिक्षक आणि मूलभूत सुविधांचा खर्च मंडळाच्या वर्गणीतून भागवला जातो. मंडळाच्या स्थापनेपासूनच राजर्षी शाहू महाराजांच्या कृतिशील विचारानं मार्गक्रमण करणाऱ्या या मंडळानं आतापर्यंत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत. कष्टाळू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कोल्हापुरातील थोरला दवाखाना अशी ओळख असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या औषध विभागाला फ्रिज, महापालिका शाळांना संगणक भेट देण्यासोबतच दरवर्षी महाआरोग्य शिबिरही मंडळाकडून घेतलं जातंय, अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी धनंजय दुग्गी यांनी दिलीय.