Sadabhau Khot माजी आमदार सदाभाऊ खोत यांची राज्यकर्त्यांना रेड्याची उपमा, पहा व्हिडिओ - विद्यार्थ्यांसाठी आयोजित
🎬 Watch Now: Feature Video
Sadabhau Khot पुणे राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते, कारण जिकडे जास्ती डोकी, तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. कारण राज्यकर्ते बोलायचे असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील. कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते. त्यांच्या पाठीवर हाथ ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत, असे मत माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संवाद या क्रार्यक्रमात सदाभाऊ बोलत होते. अर्हम फाउंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने "संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी" हा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, बच्चू कडू अति मान्यवर उपस्थित होते ,यावेळी ते बोलत होते. मंत्री लोकांना त्यांना डोकी जास्त दिसली, जे नको ते ही बोलून जातात. एखादा मंत्री बोलतो आणि त्याचा व्हिडिओ झालेला असतो. मला वाटत एमपीएससी विद्यार्थ्याचा अधिवेशन घ्यायला हव, आणि मंत्र्यांना बोलवायला हवं. संघटित होऊन प्रश्न सोडवावे लागतील. सगळ्या मजल्यावर बसलेलं अधिकारी ड्राफ्ट तयार करत असतात. मी मंत्री राहिलो आहे. आम्ही फक्त वाचतो आणि ते सगंतील तसे सही करतो. ५० टक्के मंत्र्याचे काम हा अधिकारीच करत असतात. मला वाटतं तुम्ही सगळे संघटतीत राहा, असे देखील यावेळी माजी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST