मिर्झापूर (लखनौ) - उत्तर प्रदेशमधील देहात कोतवाली परिसरात रेवा-वाराणसी महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला एका कारनं धडक दिली. या अपघातात कार चालक आणि ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर ५ भाविक जखमी झाले आहेत.
भाविक हे महाराष्ट्रातले ; कारमधील सर्व भाविक हे महाराष्ट्रातून प्रयागराज येथील महाकुंभसाठी आले होते. संगमात स्नान केल्यानंतर महाराष्ट्रातील भाविक काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी गेले. सगळे तिथून परतत असताना मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. जेसीबीच्या मदतीनं पोलिसांनी कारमध्ये अडकलेल्या भाविकांना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महाकुंभतून परत येताना अपघात- अलिबाग येथील काही भाविक प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात कारनं पोहोचलं होतं. महाकुंभ मेळ्यात स्नान केल्यानंतर सर्वजण कारनं काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी वाराणसीला गेले. तेथून ते मिर्झापूरमार्गे महाराष्ट्राच्या दिशेनं जात होतं. यावेळी, सकाळी देहात कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील बरकचा कला रेवा-वाराणसी महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून कार धडकली.
जेसीबीच्या मदतीनं कारमधून बाहेर पडले- अपघातात कार चालक सनी जयस्वाल आणि ५ वर्षांचा मुलगा श्रेयांश यांचा मृत्यू झाला. तर गाडीत प्रवास करणारी पूजा जयस्वाल, सान्वी, श्याम, सोएश आणि एक २ वर्षांची मुलगी जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली. माहिती मिळताच पोलिसही तिथे पोहोचले. अपघातात कारचं मोठे नुकसान झाल्यानंतर भाविक कारमध्ये अडकून पडले होते. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं सर्वांना कारमधून बाहेर काढले. जखमींना जिल्हा विभागीय रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. सीओ सदर अमर बहादूर म्हणाले, भाविकांची कार वाराणसीहून महाराष्ट्राच्या दिशेनं जात होती. कार ट्रकला धडकल्यानं अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या ५ जणावंर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा-