Python Rescued Video : 14 फूट लांब, 74 किलो वजन; 'या' विशालकाय अजगराची वनविभागाने केली सुटका
🎬 Watch Now: Feature Video
उत्तराखंडच्या उधम सिंह नगर जिल्ह्यातील काशीपूरमध्ये काही लोकांना एक महाकाय अजगर दिसल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला दिली. प्रकरणाची माहिती मिळताच सर्पतज्ज्ञ तालिब हुसेन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर या महाकाय अजगराची सुखरूप सुटका केली. तालिब यांनी सांगितले की, सुटका करण्यात आलेल्या अजगराची लांबी सुमारे 14 फूट असून त्याचे वजन सुमारे 74 किलो आहे. कॉर्बेट नॅशनल पार्कला लागून असलेल्या परिसरात अनेकदा वन्य प्राण्यांची दहशत असते. कधी अजगरासारखे महाकाय साप, तर कधी गुलदार आणि वाघ या भागात दिसतात. कधी कधी ते गुरेढोरे आणि माणसांनाही आपली शिकार बनवतात. तराई पश्चिम वनविभागाच्या काशीपूर रेंज, रामनगर अंतर्गत येणाऱ्या गोपीपुरा गावात या अजगराची सुटका करण्यात आली आहे.