Foreigners Visit Mahurgad: पहा, विदेशी पाहुण्यांचा माहूर गडावर जोगवा, गोंधळ - श्री रेणुका देवी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 29, 2023, 11:05 AM IST

नांदेड : माहूर गडावर मंगळवारी विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली. विदेशी पाहुण्यांनी श्री रेणुका देवी मातेचे दर्शन घेतले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ग्रीस, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पोलंड या देशातून जवळपास चाळीस विदेशी पाहुणे आले होते. त्यांनी मातेच्या दरबारात जोगवा,गोंधळ घातला. ते पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले होते. दरम्यान विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कांनव, व्यवस्थापक योगेश साबळे यांनी पाहुणे विदेशी पाहुण्यांचे स्वागत केले होते. विदेशी पाहुणे दर्शनासाठी आल्याने माहूर परिसरातील नागरिकांनी पाहुण्यांना पाहण्यासाठी प्रचंड अशी गर्दी केली होती. गडावरील नयनरम्य दृश्य पाहून विदेशी पाहुण्यांनी आनंद उत्सव सादरा केला. नवरात्राचे महत्व विदेशी पाहुण्यांना सांगण्यात आले. नागपूर येथील गाईडने या भागाची माहिती त्यांना त्यांच्या भाषेत ट्रान्सलेट करून दिली. माहूर गडाला एक महान तीर्थक्षेत्र व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख शक्तीपीठ मानले जाते. माहूर या शहराला चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.