Football World Cup फुटबॉल वर्ल्डकप कतारमध्ये पण तयारी कोल्हापूरात सुरू! - Football World Cup
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरची नेहमीच विविध विषयांमुळे चर्चा असते. याच कोल्हापूरात फुटबॉलप्रेम सुद्धा वारंवार दिसून येते. इथल्या पेठांमधल्या मुलांच्या रक्तातच फुटबॉल आहे, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. अनेक गल्ल्यांमध्ये फुटबॉलचे प्रेम दिसून येते. उद्यापासून कतार येथे फुटबॉल वर्ल्डकप सुरू Football World Cup begins होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील पेठांमध्ये फुटबॉल फिवर पाहायला मिळत आहे. एखाद्या सणाप्रमाणे तरुणांनी गल्लीत सजावट केली आहे. अनेक पताका, पोस्टर्स आणि आपापल्या आवडत्या संघाला सपोर्ट करणारे फलक लागले आहेत. पाहुयात कशापद्धतीने अवघे कोल्हापूर फुटबॉलमय Kolhapur Football झाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST