Mumbai Fashion Street Fire मुंबईतील फॅशन स्ट्रीटला भीषण आग.. पहा घटनास्थळाहून आढावा - Fashion Street
🎬 Watch Now: Feature Video

Mumbai Fashion Street Fire मुंबई मुंबईतील फॅशन स्ट्रीट Fashion Street परिसरामध्ये आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे कपड्याच्या 20 दुकानांना मोठी आग लागल्याने येथील व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फॅशन सीट परिसरामध्ये यापूर्वी देखील काही वर्षा पहिले अशाच प्रकारे मोठी आग लागली होती. या आगीमध्ये देखील लाखो रुपयांचे नुकसान येथील कपडे व्यवसायिकांचे झाले होते. मात्र आता या व्यवसायिकांसमोर पुन्हा एकदा आर्थिक परिस्थितीला सोमवार्य जावं लागणार आहे. कोरोना काळानंतर 2 वर्षानंतर नेहमीच सुरू झालेला व्यवसाय आगीमुळे पुन्हा एकदा संकटात आला आहे. आगीची माहिती कुटुंबीयांना देताना व्यवसायिकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तसेच अनेक व्यवसायिकांवर प्रश्न होता की, या आर्थिक संकटातून कशाप्रकारे बाहेर निघता येईल. आगीवर सध्या अग्निशामक दलाकडून नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तसेच या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST