Fadnavis Statue Burnt: सोलापुरातील मोहोळ तालुक्यात देवेंद्र फडणवीसांचा पुतळा पेटवला - Devendra Fadnavis Statue Burnt

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 9:38 PM IST

सोलापूर Fadnavis Statue Burnt:  सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मुख्य चौकात मराठा बांधवांनी आक्रमक होत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुतळा पेटवला आहे. जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील अंतरवली या ठिकाणी मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद सोलापुरात उमटत आहेत. (Fadnavis Statue Burnt) सोलापुरातील मराठा समाज आक्रमक झाला असून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोहोळ या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा पुतळा पेटवला आहे. (Devendra Fadnavis Statue Burnt) मराठा समाजावर पोलिसांनी जरी लाठ्या उचलल्या आहेत, मात्र त्यामागे न दिसणाऱ्या सरकारच्या लाठ्या मराठा समाजाला दिसत आहेत. (Maratha community Aggressive in Solapur) आगामी निवडणुकीत सरकारला याची फार मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा देण्यात आला. (Maratha community Agitation in Mohol taluka) शुक्रवारी रात्रीसुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने शिवाजी चौकात जालना येथील घटनेचा निषेध केला गेला. मराठा समाजातील सर्व नेते एकत्रित येत राज्य सरकारमधील तिन्ही मंत्र्याचा निषेध नोंदविला. यावेळी एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस  यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रतिमेला सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध केला.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.