Ex Cricketer Anshuman Gaikwad : यंदाचा विश्वचषक आपणच जिंकणार; माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी व्यक्त केला विश्वास - Anshuman Gaikwad on ICC Cricket world cup
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 1, 2023, 12:43 PM IST
शिर्डी Ex Cricketer Anshuman Gaikwad : सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघ चांगली कामगिरी करतोय. मी भारतीय क्रिकेट टीमचा कोच असताना माझाकडं इतका चांगला संघ नव्हता. आताचा आपला संघ काही वेगळाच आहे. तसंच सर्वच क्षेत्रात आताचा संघ उत्कृष्ट कामगिरी करत आसून यंदाचा विश्वचषक नक्कीच आपण जिंकणार असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी व्यक्त केलाय. भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी मंगळवारी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मला राजकारणातलं फार काही कळत नाही : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलना बाबत गायकवाड यांना विचारलं असता, मला राजकारणातलं फार कळत नाही. क्रिकेटबाबत कळतं. सध्या प्रत्येक समाज हा आपल्या हक्कासाठी लढत आहे. त्याचप्रमाणे मराठा लोक आपल्या अधिकारासाठी उतरले आहेत. माझ्या मते त्यात चांगलं आणि वाईटही नाही. लोकांचा उद्धार व्हावा हेच म्हत्वाचं आहे. मी पण मराठा आहे, जे काही द्यायच घ्याचे ते सारखं असाव त्यात काही वर खाली होऊ नये, असं मत भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केलं.