Driver Died : बस चालविताना चालकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद - चालकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
गुजरातमध्ये भावनगरच्या Bhavnagar in Gujarat देसाईनगरमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसच्या चालकाला बस पुढे जात असताना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस अनियंत्रित होऊन शोरूममध्ये घुसली. त्यामुळे चालकाचा मृत्यू Driver died in heart attack झाला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस देसाईनगर पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या कार शोरूमवर धडकली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पेट्रोल पंपानंतर मारुती कार शोरूमच्या बाहेर उभ्या असलेल्या कारला धडक देऊन खासगी बस मागे आली. मात्र या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटने दरम्यान चालकाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST