Dress Code by Ganesh Mandal : मुंबईकरांनो, बाप्पांच्या दर्शनाला जाताय? गणेश मंडळांनी लागू केलाय ड्रेस कोड, पहा व्हिडीओ
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई Dress Code by Ganesh Mandal : मुंबईतील अंधेरीचा राजा मंडळानं गणेश भक्तांना दर्शनासाठी एक ड्रेस कोड जारी केलाय. (Ganeshotsav 2023) हाफ पँट आणि शॉर्ट स्कर्ट परिधान करून येणाऱ्या भाविकांना अंधेरीचा राजा पाहण्यासाठी प्रवेश मिळणार नसल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलंय. ड्रेसकोडसंदर्भातील एक फलक बाहेर आणि आत लावण्यात आलाय. यात कोणत्या प्रकारच्या ड्रेसला परवानगी आहे आणि कोणत्या प्रकारच्या ड्रेसला परवानगी नाही याची छायाचित्रेही लावण्यात आली आहेत. हाफ पँट आणि स्कर्ट परिधान करून येणार्या महिला व पुरुषांसाठी येथे लूंगी आणि फुल पँटही ठेवण्यात येणार आहे. हे कपडे परिधान करून भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येईल. हा नियम 15 वर्षांपूर्वी लागू करण्यात आला असून, तो दरवर्षी पाळला जात असल्याचं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती गणेश उत्सवाचं हे 58 वे वर्ष साजरा करत असून, सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक देवस्थानांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला होता. यावरून राज्यात वादंग उठले होते. ऐन गणेशोत्सवात काही ठिकाणी पुन्हा ड्रेसकोड लागू करण्यात येत असल्याने पुन्हा यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.