आजपासून दिवाळीला सुरुवात, जाणून घ्या काय आहे वसुबारसचे महत्त्व - Vasubaras
🎬 Watch Now: Feature Video
आज वसुबारस यालाच गोवत्स द्वादशी किंवा गौबारस असेही म्हटले जाते. रूढ अर्थाने दिवाळीचा शुभारंभ वसुबारसने होतो असं मानले जाते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक विषद करणारा दिवस म्हणूनही वसुबारसेला महत्व आहे. वसु याचा अर्थ धन आणि बारस याचा अर्थ द्वादशी असा होतो. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा केली जाते. घरातील सवाष्ण महिला या दिवशी गायीच्या पायावर पाणी घालून तिचे औक्षण करतात. गायीला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. इंद्राने मुसळधार पर्जन्य वृष्टी केली तेव्हा करंगळीवर गोवर्धन उचलुन श्रीकृष्णाने आजच्याच दिवशी गोकूळातील लोकांचे रक्षण केले होते. त्या दिवसाची आठवण म्हणून आज श्रीकृष्ण, गाय आणि वासराची पूजा केली जाते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST