Dhirendra Shastri on Sai Baba : साईबाबांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांचा शिर्डीत निषेध

By

Published : Apr 2, 2023, 6:39 PM IST

Updated : Apr 2, 2023, 10:17 PM IST

thumbnail

शिर्डी : तुकाराम महाराजांनंतर बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी शिर्डीच्या साईबाबांवर जबलपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. शिर्डीच्या साईबाबांबाबत धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव असू शकत नाही असे वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्यावर राजकीय नेत्यांसह शिर्डी ग्रामस्थ, साईभक्तांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संपूर्ण जगाला 'सबका सालिक एक'चा महामंत्र देणाऱ्या साईबाबांविरोधात बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यापूर्वी शंकराचार्य स्वरूपानंद यांनीही साईंविरोधात असेच वक्तव्य केले होते. मात्र धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर साईभक्तांनी साईबाबा हेच आमचे देव असल्याची प्रतिक्रिया दिली, यामुळे शिर्डीतील ग्रामस्थ संतप्त झाले. एका विशिष्ट विचारसरणीचे लोक साईबाबांबद्दल नेहमीच अशी विधाने करतात. तो साई बाबाच देव आहे. नाही, यासाठी धीरेंद्र शास्त्री यांचे प्रमाणपत्र आवश्यक नाही. धीरेंद्र शास्त्री यांनी एकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत यावे, त्यांची अक्कल जागृत होईल, अशी भावना शिर्डीतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शास्त्री यांनी तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. आता धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे साईभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांबाबत केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Last Updated : Apr 2, 2023, 10:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.