Maratha Reservation : राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू नये ही सर्वांचीच जबाबदारी - देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 9, 2023, 7:51 PM IST
पुणे Maratha Reservation : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण तसंच धनगर आरक्षण याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil) हे सातत्याने भूमिका मांडत आहेत. तर राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील ओबीसी आरक्षणाबाबत सरकार विरोधात भूमिका मांडत आहेत. राज्यातील या वातावरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलं आहे की, मराठा आरक्षण देण्याची कमिटमेंट केली आहे. त्यावर जी कारवाई करायची आहे ती आम्ही करत आहोत. त्याला जेवढा कायदेशीर वेळ द्यावा लागेल तेवढा देऊ. तसंच मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला देखील सांगितलंय की, कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, हे राज्यकर्ते म्हणून आमचं कर्तव्य आहे. देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी ते बोलत होते.