Devendra Fadnavis On India Alliance : देश वाचवण्यासाठी नाही तर...देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीवर टीका - India Alliance Meeting

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 10:41 PM IST

नागपूर : Devendra Fadnavis On India Alliance  आज आणि उद्या मुंबईत भारत आघडीची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. जे पक्ष या आघाडीत सहभागी झाले आहेत त्यांना हे कळून चुकले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राजकारणातील आपलं दुकान आता बंद होतं आहेत. त्यामुळे ते एकत्र आले असल्याचा आरोप, फडणवीस यांनी केला आहे. ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते. इंडिया आघाडी तयार झाली आहे, आघाडीला कुठलाही अजेंडा नाही. अजेंडालेस प्रकारचं अलायन्स आहे. केवळ मोदी हटाव हा एवढा एकमेव अजेंडा घेऊन ते एकत्र आले आहेत. ते नरेंद्र मोदी यांना, जनतेच्या मनातून काढू शकत नाहीत. नरेंद्र मोदी हे त्यांच्या नेतृत्वामुळे व कर्तृत्वामुळे देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जात आहेत, त्यामुळे ते लोकांच्या मनात आहेत. गरीब कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबवला, त्यामुळे खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या मनात मोदी आहेत. त्यांचा विरोध करण्यासाठी जे पक्ष एकत्र आले आहेत ते देशाचा विचार करण्याकरींता एकत्र आले नाही, तर आपली राजकारणातले दुकान बंद होत आहेत हे दुकान कसे वाचवायचे याकरिता हे एकत्र आले आहेत. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (Devendra Fadnavis Criticism On India Alliance Meeting)
 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.