New Year Wishing नववर्षाच्या शुभेच्छा देताना, तुका म्हणे शब्दप्रयोग न करण्याचे देहु संस्थानचे आवाहन - छत्रपती शिवाजी महाराज
🎬 Watch Now: Feature Video
New Year wishing पिंपरी चिंचवड आपण सोशल मीडियाचा वापर करता का, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची नवीन वर्षाला निरोप देताना सोशल मिडियावर तुका म्हणे असा शब्द प्रयोग करून मेसेज व्हायरल केले जातात. दरवर्षी अशा आशयाचे शुभेच्छा, मित्र परिवार आणि आप्तेष्टांना देऊन महाराष्ट्रातील संतांचा अपमान केला जात असतो. त्यामुळेच देहु संस्थानने आता कडक पावले उचलली. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना इशारा दिला आहे. नववर्षासाठी शुभेच्छा देताना तुका म्हणे हा शब्दप्रयोग केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. केवळ संत तुकाराम महाराज यांच्या तुका म्हणे या शब्दाचे विडंबन केल्यावरच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रात असणाऱ्या संत, महापुरुष यांचा वापर केल्यास आणि विडंबन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देहु संस्थानने दिला आहे. त्यामुळे महापुरुष आणि संतांची नावे वापरुन कोणताही मॅसेज सोशल मिडियावर व्हायरल करु नये, असे आवाहन देहु संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST