India vs Bangladesh Ticket : क्रिकेट सामन्याच्या तिकीटांसाठी पुणेरी पाटीचा आधार; पाहा व्हिडिओ - Ticket Not Available In Gahunje Stadium
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 19, 2023, 4:11 PM IST
पिंपरी-चिंचवड (पुणे) : India vs Bangladesh Ticket : भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना आज (Cricket world Cup 2023) सुरू आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी पुण्यातील गहुंजे स्टेडियम (Gahunje Stadium Pune) येथे मॅच बघण्यासाठी आले होते. यावेळी गहुंजे स्टेडियम बाहेर पुणेरी पाट्यांचा सर्वत्र बोलबाला दिसून आला. भारत- बांगलादेश सामना बघण्यासाठी तिकीट न मिळाल्यामुळे (Online Ticket Not Available) बरेच जण स्टेडियमच्या बाहेर तिकिटांच्या प्रतीक्षेत उभे होते. त्यातच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथून आलेल्या रत्नदीप शिंदे तरुणाने ऑनलाइन टिकीट मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले होते. तरी देखील त्याला तिकीट मिळाले नाही. त्यामुळे या तरुणाने 'कुणी तिकीट देतं का तिकीट' असा मजकूर असलेल्या पुणेरी पाटीचा बॅनर हातात घेत तिकीटासाठी मदत मागितली.