ETV Bharat / health-and-lifestyle

हे जीवनसत्त्व महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम; निरोगी राहाण्यासाठी आजच करा आहारात समावेश - ESSENTIAL VITAMINS FOR WOMENS

काही जीवनसत्त्व महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. ही जीवनसत्वे ज्या अन्नपदार्थात आहेत, त्यांचे सेवन केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या टाळता येणे शक्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

WOMENS ESSENTIAL VITAMINS  MOST POPULAR WOMENS VITAMINS  WHICH VITAMINS WOMEN SHOULD TAKE  ESSENTIAL VITAMINS FOR WOMENS
ही जीवनसत्त्व महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Jan 25, 2025, 3:51 PM IST

Updated : Jan 25, 2025, 7:24 PM IST

Essential Vitamins For Women's: धावतपळत वेळेत ऑफिस गाठणं, आपल्या मुलांची तयारी करणं, जेवण तयार करनं, नवऱ्याला डब्बा देणं, अशी एक ना अनेक कामं महिलेला करावी लागतात. कामाच्या व्यस्ततेमुळे महिला स्वत:कडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देवू शकत नाही. शंभर कोटींहून अधिक मुली आणि महिला अशक्तपणा आणि कुपोषणानं त्रस्त असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. महिलांना निरोगी राहायचं असेल तर काही जीवनसत्तव महत्त्वाची भूमिका बजावतात. तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळी, हार्मोनल बदल, पुनरुत्पादन आव्हानांना महिलांना समोरं जावं लागतं. अशा वेळी योग्यरित्या कार्य करण्यासाठी पुरेसे जीवनसत्त्व आवश्यक आहेत. अनेक स्त्रिया औषधांच्या स्वरूपात जीवनसत्त्व घेतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते, शरीराला आवश्यक जीवनसत्त्व अन्नाद्वारे देणं उत्तम आहे. महिलांसाठी सर्वात महत्वाचे जीवनसत्त्वे कोणती? ते कोणत्या पदार्थांमध्ये आढळतात ते जाणून घेऊया.

  • व्हिटॅमिन ए: व्हिटॅमिन एमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. व्हिटॅमिन ए दृष्टी सुधारण्यास मदत करते. तसंच हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन ए महत्त्वाची भूमिका बजावते. हे जीवनसत्व पुनरुत्पादक आरोग्यासाठी महत्वाचे आहे. शिवाय या व्हिटॅमिनचे नियमित सेवन केल्यास जुनाट आजार टाळता येतात, असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे. मासे, दूध, अंडी, टोमॅटो, गाजर, पेरू, पपई, पीच, ब्रोकोली, भोपळा, पालक यासह इतर पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते.
  • व्हिटॅमिन बी ३ : तज्ज्ञांच्या मते, महिलांसाठी व्हिटॅमिन बी ३ खूप महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन बी 3 पेशींच्या वाढीसाठी आणि कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. व्हिटॅमिन B3 अनेक शारीरिक कार्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावते, ज्यामध्ये पोषक तत्वांचे ऊर्जेमध्ये रूपांतर करणे, DNA आणि मज्जासंस्थेच्या कार्याचा समावेश आहे. व्हिटॅमिन B3 ची कमतरता टूना मासे, मसूर, मशरूम, गहू, दूध, अंडी आणि बीन्समध्ये खाऊन पूर्ण होऊ शकते.
  • व्हिटॅमिन बी 6: हे जीवनसत्व शरीराला हार्मोन्स तयार करण्यास आणि मेंदूतील रसायने सोडण्यास मदत करते. तसंच अशक्तपणा टाळण्यास आणि PMS लक्षणे कमी करण्यास देखील मदत करते. बीन्स, बिया, कोंबडीची अंडी, फोर्टिफाइड तृणधान्ये, एवोकॅडो, केळी, मांस, ओटमील, सुकामेवा यांमध्ये व्हिटॅमिन बी 6 जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
  • व्हिटॅमिन बी 9: फॉलिक ॲसिड म्हणून ओळखले जाणारे व्हिटॅमिन बी 9 महिलांसाठी खूप महत्वाचे आहे. न्यूरल ट्यूब दोष टाळण्यासाठी बाळाच्या मणक्याचे आणि मेंदूचे संरक्षण करते. तसचं महिलांमधील कर्करोग, उच्च रक्तदाब, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या आजारांना प्रतिबंधित करते. या जीवनसत्त्वाची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, बीन्स, कडधान्ये, अंडी, संत्री, केळी, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि मासे घ्यावीत.
  • व्हिटॅमिन बी 12: व्हिटॅमिन बी 12 लाल रक्त पेशी, चयापचय दर वाढवणे, पेशी विभाजन आणि प्रथिने संश्लेषणास मदत करते. महिलांमधील अशक्तपणा टाळण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 महत्वाचं आहे. व्हिटॅमिन बी 12 मासे, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि अंडी यामध्ये मुबलक प्रमाणात असते. असं 2018 मध्ये जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या 'प्राणी उत्पादनांची व्हिटॅमिन बी12 सामग्री' या अभ्यासात आढळून आलं.
  • व्हिटॅमिन सी: रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारा पोषक घटक म्हणून ओळखला जाणारा व्हिटॅमिन सी महिलांसाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे स्तनाचा कर्करोग आणि इतर जुनाट आजारांचा धोका कमी होतो. विशेषतः हे गरोदर आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप चांगले कार्य करते. तसंच रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावते. ब्रोकोली, ग्रेपफ्रूट, किवी, संत्री, बटाटा, स्ट्रॉबेरी आणि टोमॅटोमध्ये हे जीवनसत्व पुरेशा प्रमाणात आढळत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
  • व्हिटॅमिन डी: गर्भवती महिलांमध्ये रक्तदाब आणि अकाली प्रसूती कमी करण्यासाठी व्हिटॅमिन डी फायदेशीर आहे. तसंच हार्मोनल संतुलन प्रजनन प्रणाली प्रभावीपणे कार्य करण्यास मदत करते. मशरूम, अंडी, मासे आणि सूर्यप्रकाशाच्या प्रकाशातून देखील व्हिटॅमिन डी मिळते.
  • व्हिटॅमिन ई: व्हिटॅमिन ई रोगप्रतिकारशक्ती, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. प्रजनन, हृदयाचे आरोग्य आणि संप्रेरक संतुलनासाठी व्हिटॅमिन ई आवश्यक आहे. शेंगदाणे, बदाम, एवोकॅडो, पालक, किवी, मासे आणि अंडी यामध्ये ते मुबलक प्रमाणात आढळते असं तज्ञ म्हणतात.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://www.healthline.com/nutrition/vitamins-for-women#How-we-chose

हेही वाचा

  1. पोटदुखी? व्यायामाशिवाय पोटाची चरबी कशी कमी करावी
  2. 'या' समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही 'या' कॉफी घेऊ नये
  3. प्रतिकारशक्ती वाढवायची आहे का? अग आज़च करा अहारात अक्षाट करा अग्या अच्चा अच्चा अच्छा
  4. व्यायामानंतर पाणी पिणे महाग आहे का? पाणी पिताना 'ही' ग्या जुझा
  5. मेंदूचे कार्य सुधारण्यापासून त्वचेसाठी फायदेशीर आहे ‘हे’ लाल फळ
Last Updated : Jan 25, 2025, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.