ठाणे : बांगलादेशातून ३० वर्षांपूर्वी भारतात येऊन एका तरुणीनं विवाह करुन मुलेबाळे झाली. अन् भारतवासी झाली. मात्र, तिचा परिवार बांगलादेशात आहे. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी तिची बहीण घुसखोरी करून भारतात आली अन् कळवा पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. कळवा पोलिसांनी तिच्या विरोधात घुसखोरीचा गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतलं आहे. तिच्यावर कायदेशीर कारवाई करून तिला बांगलादेशात पुन्हा पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बांगलादेशी बहिणीला भेटायला आली अन्ं... : ३० वर्षांपूर्वी भारतात येऊन बांगलादेशी महिला ठाण्यात राहू लागली. तिने ठाण्यात भारतीय इसमाशी लग्न केलं. बघता-बघता त्यांना मुले झाली. तीही मोठी झाली. भारतात येणे ते मुले मोठी होई पर्यंतचा ३० वर्षाच्या कालावधीत ती महिला आपल्या परिवाराला भेटण्यासाठी कधी गेलीच नाही. मात्र, आपल्या बहिणीनं भारतात लग्न केलं. तिला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या बहिणीला ठाण्यात कळवा भागातील शांतीनगर परिसरातून अटक करण्यात आली आहे.
ठाण्याच्या कळवा परिसरात वास्तव्यास : अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव खालिदा बेगम असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश उतेकर यांनी दिली. सध्या ठाण्यात बांगलादेशी नागरिकांच्या धारपकडीची विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना एक घुसखोर बांगलादेशी महिला कळव्यात राहात असल्याची गोपनीय माहिती विभागाला मिळाली. पोलिसांनी खालिदा बेगमच्या शोधासाठी एका संशयिताकडे चौकशी केली. तेव्हा समजलं की, कळव्यात घुसखोरी करून राहणारी महिला ही त्या मुलाची मावशी असल्याचं समोर आलं. त्या तरुणाने सांगितलं, माझी आई ही बांगलादेशी आहे. ३० वर्षांपूर्वी ती भारतात आली आणि विवाहकरून इथंच राहिली. माझी मावशी ही बांगलादेशातून आल्याचं आणि कळवा परिसरातील झोपडपट्टी इथं राहात असल्याची माहिती तरुणाने दिली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे कळवा पोलिसांनी परिसरातील झोपडपट्टी असलेल्या शांती नगरमध्ये शोध घेतला. त्यावेळी खलिदा ही एकटीच झोपडपट्टीत राहत असल्याचं उघड झालं. तिच्याकडं अधिक चौकशी केली असता तिनं दिलेल्या माहितीत ती आपल्या बहिणीला भेटण्यासाठी ठाण्यात आल्याचं आणि इथंच राहिल्याचं सांगितलं.
घुसखोरी करत भारतात आली : यापूर्वीही ती दोन ते तीनवेळा भारतात आली होती. मात्र, त्यावेळी येताना ती व्हिसा आणि कागदपत्रांच्या आधारे भारतात येऊन बहिणीला भेटून मायदेशी परतली होती. यावेळी तिला भारतात येण्यासाठी रीतसर व्हिसा न मिळाल्यामुळं ती घुसखोरी करून ठाण्यात आली. बहिणीला भेटली आणि कळव्याच्या शांतीनगरमध्येचं एक रूम भाड्यानं घेऊन एकटीच राहू लागली. पण, बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सदरची माहिती समोर आल्यानं खालिदा बेगमला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई ही कायदेशीर नियमानुसार होणार असल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वपोनि. सतीश उतेकर यांनी दिली.
हेही वाचा :