Beed News : बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केला सहकुटुंब एसटीने प्रवास; राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन - बीड जिल्हाधिकाऱ्यांचा महामंडळाच्या बसमधून प्रवास
🎬 Watch Now: Feature Video
बीड : बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी आज बीड बस स्थानकातील आढावा घेऊन एसटी महामंडळाच्या बसने प्रवास केला. राज्य शासनाने नुकतेच महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारने 75 वर्षांवरील वयोवृद्धांना मोफत बस सेवा प्रदान केली आहे. याच योजनेचा आढावा मुधोळ यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तिकीट काढून बीड ते मयूरअभयारण्य असा सहकुटुंब प्रवास केला. यावेळी त्यांच्या दोन मुली, आई सोबत होत्या. राज्य शासनाने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केले आहे. ज्या जुन्या बस आहेत. त्यांना लवकरच दुरुस्त करून महिलांचा प्रवास सुखकर व्हावा. या उद्देशाने राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे देखील मुधोळ यांनी यावेळी म्हटले आहे.