Cobra Snake In Matoshree: मातोश्रीच्या परिसरात 'तो' दिसताच धावाधाव...पहा नेमके काय घडले? - Uddhav Thackeray news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/07-08-2023/640-480-19200038-thumbnail-16x9-cobra.jpg)
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील 'मातोश्री' निवासस्थानी कोब्रा हा विषारी नाग सापडला. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कलानगर, बांद्रा पूर्व येथील उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' बंगल्यावरून 'वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोसिएशन' संस्थेला एक फोन आला. त्यात त्यांनी 'मातोश्री' बंगल्याच्या आवारात एक नाग फिरत आहे. त्यासाठी आम्हाला सर्पमित्राची मदत हवी आहे, असे म्हटले. फोन येताच 'सर्पमित्र' अतुल कांबळे हे घटनास्थळी गेले. त्यांना हा 'भुजंग' पाण्याच्या टाकीमागे बसलेला दिसला, असे त्यांनी सांगितले. हा 'कोब्रा' या विषारी जातीचा नाग असून त्याची लांबी अंदाजे ४ फूट होती. हा साप रेस्क्यू करून त्याची माहिती ठाणे वनविभागाच्या कंट्रोल रूमला देण्यात आली. त्या हद्दीतील अधिकारी रोशन शिंदे यांना फोन करून ही माहिती कळवली. हा नाग हा पूर्णपणे सुखरुप आहे. त्यामुळे त्याला वनविभागाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जंगलात सोडण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे.