Gautami Patil : गौतमी ताई, कृपया महाराष्ट्राचं बिहार करू नका.. ; पाहा काय म्हणाला छोटा पुढारी - धनश्याम दरोडे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : सध्या राज्यातल्या विविध गावांतील जत्रांमध्ये लावणी कलाकार गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जमते आहे. मात्र आत्तापर्यंत गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमांवर अनेक लावणी कलाकारांनी आक्षेप देखील घेतला आहे. अश्यातच आता छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला बाल कलाकार धनश्याम दरोडे याने देखील गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावर आपले मत व्यक्त केले आहे. गौतमी ताईंना कळकळीची विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती मोडू नका. लावणीला लावणी सारखं राहू द्या. तुम्ही तुमच्या प्रमोशन साठी कुठल्याही अश्लीलतेचा वापर करू नका. तुम्ही महाराष्ट्राची वाटचाल बिहार कडे करत आहे. पण महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही. कलेला कलेप्रमानेच सादर केलं पाहिजे, असे यावेळी छोटा पुढारी धनश्याम दरोडे म्हणाला आहे.