Eknath Shinde Visit To Mukta Tilak House मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी सांत्वनपर भेट - मुक्ता टिळक यांचे पक्षासाठी खूप मोठे योगदान
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवंगत भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या पुण्यातील घरी सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात मी केसरी वाड्याला भेट दिली, तेव्हा मुक्ता टिळक ( Bjp MLA Mukta Tilak) यांच्याशी खूप वेळ चर्चा झाली. असे वाटले होते की मुक्ताताई आजारावर मात देतील. मात्र जेव्हा त्यांच्या निधनाची ( Bjp MLA Mukta Tilak Died In Pune ) वार्ता कळाल्याने दुख झाले. मात्र मी अधिवेशनात असल्याने मला येता आले नाही. त्यावेळेस मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांना पुण्याला जायला सांगितले. आमदार मुक्ता टिळक यांचे पक्षासाठी खूप मोठे योगदान होते. त्यांनी पक्षासाठी मोठे काम केल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST